"शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील बहुतांशी विषयाच्या  परीक्षा  पुढे ढकलण्यात आल्या असून काही विषयांच्या परीक्षा मात्र होणार आहे.
     
शिवाजी विद्यापीठाच्या  रात्री उशिरा आलेल्या जाहीर प्रकटन पत्राद्वारे  विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० च्या हिवाळी सत्रातील २२/३/२०२१ आणि २३/३/२०२१ पासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाच्या बी.ए./ बी.कॉम./बी.एस्सी./ बॅचलर ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट व बी.एस्सी.फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या  अभ्यासक्रमांच्या परीक्षा तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात  असल्याचे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.
   
 तसेच वरील अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार यथावकाश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत असल्याचे व तसेच उर्वरित इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments