धोनीचा संन्यासी लूक व्हायरल!


 भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा नवा संन्यासी लूक व्हायरल होत आहे. 

 धोनीचा नवा लूक बघून चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी उत्सुकतेपोटी प्रश्न विचारले आहेत तर काहींनी नव्या लूकचे कौतुक केले आहे. 

धोनीने नवा संन्यासी लूक एका जाहिरातीसाठी घेतला आहे. या लूकमध्ये धोनीच्या डोक्यावर केस दिसत नाही. तो संन्याश्याच्या वेषात आहे. 'स्टार स्पोर्ट्स'ने धोनीच्या संन्यासी लूकमधील फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. 

Post a Comment

0 Comments