पाटण तालुक्यातील मोरेवाडी ( कुठरे) येथील एका कुटुंबातील पुरुष आणि वृद्ध आईचा अर्धवट जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्तीचे नाव सचिन लोकरे( वय ३८) व वृद्ध आई कमल लोकरे ( वय ६१ ) आहे. दोघांचा राहत्या घरात मृत्यू झाला आहे या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ढेबेवाडी पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मयत सचिन ज्ञानदेव लोकरे व सौ.कमल ज्ञानदेव लोकरे हे मोरेवाडी येथिल लोकरेवस्ती येथे राहत होते. सचिनचे वडील ज्ञानदेव लोकरे हे आजारी असून त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू होते सचिनचा भाऊ नितीन हा त्यांच्याबरोबर कराड येथे होता.त्यामुळे सचिन व आई कमल हे दोघेजण घरी होते.
0 Comments