पंढरपूर पोटनिवडणूक! शैला गोडसेंवर कार्यकर्त्यांचा दबाव वाढला; कोणत्याही परिस्थितीत पोटनिवडणूक लढवण्याची मागणी

 

पंढरपूर/प्रतिनिधी:

शैला गोडसे या एक महिला असूनही पुरुषांना लाजवेल असा त्यांचा बाणा त्यांच्या देहबोलीतून दिसतो आहे. आजपर्यंत मंगळवेढा तालुक्यातील जनतेने ज्या नेत्यांना भरभरून मतदान केले. अशा कोणत्याही नेत्याने दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नावर व तसेच इतर भागातील अनेक प्रश्नांवर कधीही आवाज उठविला नाही.

पण शैलाताई गोडसे यांना मंगळवेढा तालुक्यातील जनतेने काहीही दिलेले नसताना त्यांनी मंगळवेढा तालुक्याच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून वेळोवेळी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामध्ये शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्यासाठी केलेले आंदोलन, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील आठ गावांचा म्हैसाळ योजनेतील नव्याने समावेश करण्यासाठी उभारलेला लढा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी नंदेश्वर येथे केलेले लाक्षणिक आंदोलन,तसेच तालुक्याच्या पूर्व भागाला कॅनॉलचे पाणी मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा अशा अनेक प्रश्नांवर शैलाताई गोडसे यांनी मोठा आवाज उठविला आहे.

यामध्ये शिरनांदगी तलावात म्हैसाळ योजनेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पोहोचले तसेच म्हैसाळ योजनेत मंगळवेढा तालुक्याच्या आठ गावांचा नव्याने समावेश होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अशाप्रकारे त्यांनी दोन महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील जनतेने शैलाताई गोडसे यांना काहीही न देता शैलाताई यांनी मोठे योगदान मंगळवेढा तालुक्यासाठी दिले आहे. याची तमाम जनतेला जाण आहे. प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्यामुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत.

Post a Comment

0 Comments