मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचं नाव आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचीही मनसुख हिरेनप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.
आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.
दरम्यान, सचिन वाझेंचं नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाने परमबीर सिंग यांचीही बदली करावी, अशी मागणी केली होती. यानंतर आता सरकारने मुंबई पोलिस दलामध्ये मोठे बदल केले आहेत. DGP हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईचं पोलिस आयुक्तपद सोपवण्यात आलं आहे. तर परमबीर सिंग यांची बदली होमगार्ड विभागात करण्यात आली आहे.
0 Comments