बार्शी/प्रतिनिधी:
परंतु रिक्षाचालक राजाभाऊ मुंढे यांनी त्या महिलेकडे सदर सोने परत सुपुर्द करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.
बार्शी मध्ये पुन्हा एकदा प्रामाणिकपणाचे दर्शन झाले
बार्शी रिक्षातून प्रवास करताना एक महिला सोन्याचे
दागिने, आधार कार्ड, पॅनकार्ड असलेली पर्स रिक्षातच विसरल्या होत्या. परंतु रिक्षाचालक राजाभाऊ मुंढे यांनी त्या महिलेकडे सदर सोने परत सुपुर्द करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.
त्याचे झाले असे की, विजया आशिष मोरे
(रा. जावळी प्लॉट बार्शी) या रिक्षातून प्रवासादरम्यान त्यांची पर्स उतरताना विसरल्या होत्या, विजया मोरे यांनी पर्स गहाळ झाल्याची तक्रार पोलीसात नोंदविली. त्यानुसार रिक्षा संघटनेचे राजेंद्र मुळे यांच्यासह रिक्षाचालक ग्रुपवर सदर मेसेज व्हायरल करण्यात आला. दरम्यान,
संबंधित रिक्षाचालक मुंढे यास दुसरे भाडे लागल्याने
ते परगावी गेले होते. पण त्यांनतर ते थोडाही विलंब न करता त्या महिलेचा शोध घेतला. आणि बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या समक्ष सोन्याचे दागिने, आधार
कार्ड, पॅनकार्ड असलेली पर्स परत केली
0 Comments