बार्शी/प्रतिनिधी :
बार्शी परंडा रोडवर फाट्याजवळ दुपारी सुमारे ४.०० वाजताच्या दरम्यान वारदवाडी आणि हिंगणगाव या मधोमध अपघात घडून आला. अपघातामध्ये एक फोर व्हीलर चालक जखमी झालेला असून,टू व्हीलर चालक गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे धडक होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली व तात्काळ बार्शी येथील हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार फोर व्हीलर चालक हा बार्शी कडून परंडा मार्गाने निघालेले होते व टू व्हीलर चालक हे परंडा मर्गाहून बार्शी कडे येत होते.यात समोरासमोर धडक लागून दोन्ही गाड्या रोड च्या खाली उतरल्या होत्या.
0 Comments