बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी व प्रमुख शहर व गांवामध्ये सध्या थँक्यू मोदी सरकार" च्या उपहासात्मक बॅनरनी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकार विरोधात बॅनर्स लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. पेट्रोल शंभरीच्या आसपास, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, बेरोजगारी व आकाशाला भिडलेल्या महागाईचा उल्लेख बॅनरमध्ये केलेला आहे.
इंधन महागले प्रवास करणार कसे ? अन्नधान्य महागले खाणार काय? गॅस महागले अन्न शिजवणार कसे ? जनता विचारतेय मोदाजी,उत्तर द्या असे प्रश्न बॅनरवर उपस्थित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाभर महत्त्वाच्या ठिकाणी "सब जगसे पड रही है मार थँक्यू मोदी सरकार"असे फलक लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे. राज्यामध्ये धन्यवाद मोदी सरकार ही मोहिम राबवत आहोत. इथून पाठीमागे मोदी साहेबांनी जी महिला वर्गाच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली ती आता आम्ही होवू देणार नाही. महिला वर्ग आता मोदींना मतदान करणार नाही, असा या मोहिमेपाठीमागचा उद्देश असल्याचं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
0 Comments