हातकणंगले तालुक्यातील एक बिनडोक पदाधिकारी आपणास मिळालेल्या आधिकाराचा गैरवापर करून शिक्षकाना त्रास देत असल्याचे आम्हास समजले आहे.
पुर्विच्या पेठा असलेल्या गावात दोन जि.प. च्या शाळा असुन पैकी एक शाळा त्याने लक्ष केली आहे.आपणास मान देत नाहीत,पार्टी देत नाहीत अशा भ्रष्ट कारणावरून हा पदाधिकारी शिक्षक नसताना वा शिक्षक शाळेत येण्यापुर्वी,शाळेत जाऊन मोबाईल वर चित्रण करून जिल्हा परिषद सीईओ पर्यन्त तक्रार करीत आहे. कोरोना काळात शाळा किती भरते हे सर्वाना माहित आहे.हा पदाधिकारी स्व:त अल्पशिक्षित असुन पदवीधर शिक्षकाना ज्ञानाचे डोस पाजत तमाम शिक्षकाना वेठीस धरत आहे.
मुख्यमंत्राना एवढेच काम आहे काय?
हा बिनडोक पदाधिकारी ही तक्रार डायरेक्ट मुख्यमंत्र्यापर्यन्त नेणार असल्याचे सांगत फिरत असुन यामुळे शिक्षक वर्ग हबकला आहे. वास्तविक असली किरकोळ तक्रार मुख्यमंत्री एेकुन घ्यायला,मुख्यमंत्राना एवढेच काम आहे का!याचीही अक्कल नाही.
खरेतर असले अल्पशिक्षित पदाधिकारी न निवडलेले बरे.
निवडणूक लढवतानाच "पदवी" ची अट घालावयास हवी. हा अतिशहाणा पदाधिकारी तक्रारीचा पाऊस पाडत असताना याच्या घरातील नाजुक प्रकरणाची लोक चवीने चर्चा चघळत आहेत.याची या पटयाला वार्ताही नाही.
0 Comments