बार्शी! सरकारी कामात अडथळा आणून धक्काबुक्की व शिवीगाळ केली; चार जणांवर बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

मामासाहेब घुमरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २६/०३/२०१९  रोजी दुपारी १२.३० ते अडीचच्या दरम्यान दादा माणिक बरबडे अर्जदार नामी शेती गट नंबर ६२ रस्तापूर तालुका बार्शी येथे हद्दी खुणा कायम मोजणी चे सरकारी काम करीत होते.

ते करत असताना फिर्यादीस कायदेशीर कामात अडथळा आणून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्यामुळे पांडुरंग विठ्ठल बरबडे, विनोद पांडुरंग बरबडे, सुब्राव पांडुरंग बरबडे, भाग्यश्री उर्फ दीदी पांडुरंग बरबडे राहणार सर्व रस्तापूर तालुका बार्शी यांच्यावर बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सूर्यवंशी हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments