सेव्ह सोलापूर व्हॉट्स अॅप ग्रुपच्या मिटिंग मध्ये झाले ब्रँड सोलापूर विषयी मंथन
निलची शाळा येथे आयोजित गिरिकर्णिका फाऊंडेशन संचलित सेव्ह सोलापूर सिटिझन फोरम व्हॉट्स अॅप ग्रुपची पाचवी मिटिंग सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, विचारमंथन आणि विवेचन करुन संपन्न झाली. सोलापूरचे ब्रँड सातासमुद्रापार पोहचण्यासाठी सर्व सोलापूरकरांच्या वतीने सकारात्मक व्यापक प्रयत्न होणे आवश्यक आहे असा आशावाद सभेत व्यक्त करण्यात आले.
१८८० साली महसूल उत्पन्नात सोलापूर भारतात सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर होते, १९७० सालापर्यंत महसूल उत्पन्नात महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकावर सोलापूरची ख्याती आणि महत्वाचे योगदान भारतीय अर्थव्यवस्थेला देत होते. आय.टि. क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याने १९८० सालापासून सोलापूरातील तरुण पिढी स्थलांतर होण्यास सुरुवात झाली आणि सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागायला सुरवात झाली. हे चित्र बदलण्यासाठी सर्व सोलापूरकरांच्या वतीने सर्व क्षेत्रातुन व्यापक सकारात्मक प्रयत्न होणे आवश्यक असल्याची माहिती गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी उपस्थितांना दिली. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या प्रशांची सोडवणूक करण्याची नैतिक जबाबदारी हे सर्व सोलापूरकरांचे आद्य कर्तव्य असून येथील प्रत्येक नागरिकांनी सोलापूरचे ब्रँड सातासमुद्रापार पोहचण्यासाठी त्यांच्या परिने प्रयत्न केल्यास निश्चित ह्या कार्यास यश मिळेल असा सुर उपस्थित मान्यवरांनी मिटिंग दरम्यान व्यक्त केला.
सोलापूरच्या तरुणांमध्ये प्रचंड उर्जा आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छाशक्ती असून त्यांच्या बौध्दिक क्षमतेला सोलापूरातच योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास नवीन रोजगार निर्मिती होऊन इथल्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसेल असे महत्त्वपूर्ण सल्ला उद्योजक तथा पुणेरी सोलापूरकर योगिन गुर्जर यांनी दिला. सोलापूरात को-वर्कींग स्पेस, स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि आय.टि.पार्क निर्माण केल्यास इथले स्थलांतर थांबेल असे विद्या कॉम्प्युटरचे प्रमुख अमित कामतकर यांनी सांगितले.
सोलापूरची चादर, शेंगा चटणी आणि कडक भाकरी यांच्यासमवेत सोलापूरच्या सर्व सकारात्मक बाबींचे डॉक्युमेंटेशन आणि व्यापक डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सोलापूरकरांनी खारीचा वाटा उचलायला हवा असे निलची शाळाचे अध्यक्ष श्रीकांत अंजुटगी यांनी विचार व्यक्त केले. सेव्ह सोलापूर सिटिझन फोरम व्हॉट्स अॅप ग्रुपच्या पाचव्या मिटिंग मध्ये राम सोनावणे, अनंत कुलकर्णी, विजय बाहेती, सुहास कटारे, प्रसाद गोटे, प्रविण तळे, नागेश बोमालेकर, रत्नदीप गोरे, अर्जुन रामगिर, राज माखिजा, आनंद हुलगेरी, निखिल शहा, यशपाल चितापुरे, चंद्रकांत इश्वरकट्टी, सूशांत शेंडगे, शांता येळंबकर आदी उपस्थित होते. मिटिंगचे प्रास्ताविक गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार श्रीकांत अंजुटगी यांनी मानले.
0 Comments