अकलूजच्या ग्रामपंचायत सदस्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल


अकलूज/प्रतिनिधी:

माळशिरस तालुक्यामध्ये एका मुलीस 'तुझ्या प्रियकराकडून तुला पैसे मिळवून देते' असे आमिष दाखवून प्रियकराच्या कुटुंबांना १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अकलूज ग्रामपंचायत सदस्य ज्योती कुंभार यांच्याविरुद्ध अकलूज पोलीस स्टेशन मध्ये खंडणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रियकराच्या घरच्यांकडून पंधरा लाख पैकी सव्वा लाख रुपये खंडणी म्हणून ज्योती कुंभार यांनी घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील लवंग येथील अक्षय शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीचे लैंगिक अत्याचार केले होते. त्या मुलीने सदर अक्षय शिंदे यांच्या विरोधात १८ मार्च रोजी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अक्षय शिंदे यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाची पोलिस चौकशी करत असताना प्रियकराच्या घरच्यांकडून ज्योती कुंभार खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला.

ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या ज्योती कुंभार यांनी सदर मुलीस तुझा प्रियकर तुला परत मिळवून दे त्याच्याकडून पैसे मिळवून देते असे आमिष दाखवून सदर प्रियकराच्या कुटुंबाला पंधरा लाख रुपयाची खंडणी मागितली त्यातील अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाने ज्योती कुंभार यांना एक लाख पंचवीस हजार रुपयांची खंडणी घेतली यामध्ये ज्योती कुंभार यांनी अक्षय शिंदे व त्यांच्या कुटुंबाला खंडणी बाबत मारहाण केली याबाबत अकलूज पोलीस स्टेशन मध्ये ज्योती कुंभार यांच्या यांच्याविरधात खंडणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, न्यायालयाने २४ मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments