संजय राऊतांनाच मुख्यमंत्री करा - चंद्रकांत पाटील


सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणीत भर पडली असून राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमक झाला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सरकारची बाजू मांडल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, त्यांच्याशिवाय मंत्रीमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. दोन तपास यंत्रणाकडून तपास सुरु आहे. हळूहळू सत्य बाहेर येत असून लवकरचं सरकारचा बुरखा फाटणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments