बार्शी/प्रतिनिधी :
सीना नदीच्या पात्रातून चोरुन आणलेली वाळू घेवून जाणारा ट्रक तालुक्यातील बळेवाडी येथे अडवून मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळू व वाहने असा सुमारे १८,४१,५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलिस नाईक लालसिंग तुकाराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात १) राहुल अंकुश भिसे, २) नागेश हरीदास चव्हाण ३) आण्णा प्रल्हाद चव्हाण ४) धनाजी शिवाजी कानगुडे ५) दाउद बाबा शेख सर्वजण रा. पानगांव ता.बार्शी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
एलसीबीचे पो.नि. सर्जेराव पाटील, सपोनि. शाम बुवा, हवालदार बिरूदेव पारेकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, नाईक परशुराम शिंदे, राहुल सुरवसे बार्शी हद्दीत गस्त यालत मौजे बळेवाडी येथे आले. असता सकाळी ४.१५ वा. त्यांना बार्शी ते बळेवाडी रोडवर ट्रक क्रं एमएच १३ एक्स २०१३ हा चोरीची वाळू येवून बळेवाडीच्या दिशेने येत आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदर क्रमांकाचा ट्रक थांबविला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये चार ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. ट्रकचालक नागेश चव्हाण याने ट्रकचा मालक राहुल अंकुश भिसे हा असून न त्याने मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी बोपले येथील
सीना नदीचे पात्रातून गणेश श्रीराम व समाधान श्रीराम रा. गलंदवाडी ता. मोहोळ, दिनकर ढेरे रा. बोपळे ता. मोहोळ यांनी चोरुन वाळु काटुन साठा करून विक्री वर्ग करीता ठेवलेल्या ठिकाणाहून साठा केलेली वाळु आण्णा चव्हाण, धनाजी कानगुडे, दाऊद शेख या मजुरांना घेवुन जावून ट्रक मध्ये भरुन येतून परीसरात विक्रीकरीता भरून आणले असल्याचे सांगितले. थोड्याच वेळातच ट्रकामालक राहुल भिसे हा आपल्या कार क्रं. एमएच १३ डीई ने ६३२० मधून तेवे आला. त्याच्याकडे वाळू उपसा व वहातूकीची परवानगी नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे त्यांच्या कब्जातील वाळू व वाहने जप्त न करण्यात आली, त्यांच्या विरुध्द स्वत: चे आर्थीक फायदयाकरीता वाळू काढून ती चोरुन विक्री करीता घेवुन जात असताना मिळून आले म्हणून भा.द.वि.क, ३४९,३४ पर्यावरण संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ९, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
0 Comments