बार्शी/प्रतिनिधी:
पतीच्या व्यसनाला कंटाळून त्याच्यापासून विभक्त राहणाऱ्या पत्नी व मुलास आकसाने दगडाने मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील माडेगाव येथे घडली. जखमी पत्नीच्या फिर्यादीनुसार पतीविरोध बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सविता शिवाजी कादे या महिलेचे माहेर व सासर मांडेगावाच असून पतीचे नाव शिवाजी अंबऋषी कादे यांना दारू व गांजाचे व्यसन आहे. त्यामुळे तो त्रास देत असल्याने मुलगा ऋषिकेश मुलगी वृषाली यासह ती आई-वडिलांकडे राहत आहे. पती त्याचा घराजवळ एकटाच राहतो. सकाळच्या सुमारास त्या भांडे घासत होती, मुलगा ऋषिकेश पाणी आणायला गेलेला होता. आई कस नाव आई वडील मच्छिंद्र सकाळी ज्वारी काढायला गेले होते. त्यावेळी नवरा शिवाजी सकाळी सकाळी जोरात शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी दगडाने मारहाण सुरु केली. यामध्ये पीडिता हि जखमी झाली आहे. यावेळी 'मी मरतो तुमच्यावर नाव घेतो' अशी धमकी देऊन निघून गेला.
0 Comments