बार्शी शहरातील विकास कामांच्या बळावर, आगामी नगर परिषद निवडणुकीत जिंकायचं - आमदार राजेंद्र राऊत


बार्शी/प्रतिनिधी:

आगामी नगरपरिषद निवडणूक, बार्शी शहर व शहराच्या विस्तारित भागात झालेली विकास कामे, सध्या सुरू असलेल्या अनेक विकास कामांचा आढावा, नव्याने सुरू करण्यात येणारी विकास कामे व कोरोना विषाणूचा दुसऱ्या टप्प्यातील वाढता प्रादुर्भाव यासंबंधी बार्शी नगर परिषदेत सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली.

या आढावा बैठकीत मागील चार वर्षांच्या कालावधीत कोरोनाचा कालावधी सोडता बार्शी शहरात विविध प्रकारची पूर्ण झालेली विकास कामे, सध्या सुरू असलेली विकास कामे व नव्याने सुरू करण्यात येणारी विकास कामे यांचा आढावा घेतला. नागरिकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन त्यांना देण्यात येत असलेल्या अनेक सोयी-सुविधा, रस्ते, गटारी, लाईट, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा, त्याचप्रमाणे कोरोना कालावधीत नागरिकांची घेतलेली काळजी, कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना आदी कामांचा आढावा घेण्यात आला.

त्याचबरोबर कोरोना विषाणूचा दुसऱ्या टप्प्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता त्याच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी व खबरदारी, त्याचप्रमाणे करावयाच्या उपाययोजना या संबंधी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.

या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात केलेली विकासकामे, सध्या सुरू असलेली विकास कामे व नव्याने सुरू करण्यात येणारी विकास कामे यांची माहिती प्रत्यक्ष नागरिकांसमोर जावून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना द्यावी. आगामी नगरपरिषद निवडणुकीत जिंकायचं म्हणजे जिंकायचंच आहे. विरोधकांवर विजय मिळवून पुन्हा एकदा नगर परिषदेत सत्ता आणायचीच आहे, त्या दृष्टीने सर्वांनी कार्य करण्याच्या सूचना सर्व नगरसेवकांना दिल्या.

या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील , माजी नगराध्यक्ष रमेश पाटील , नगरसेवक प्रशांत कथले, सुभाष शेठ लोढा, भारत पवार सर, पक्षनेते विजय नाना राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, दिपक राऊत, अमोल चव्हाण, कयूम पटेल, नागजी दुधाळ, बापूसाहेब वाणी, बाळासाहेब लांडे, आदिनाथ गायकवाड, विजय चव्हाण, भैय्या बारंगुळे, मदन गव्हाणे, ॲड. महेश जगताप, आण्णासाहेब लोंढे, शरद काका फुरडे, रोहित लाकाळ, संदेश काकडे, रितेश वाघमारे, रमाकांत सुर्वे, राजाभाऊ पोफळे, अलिशेर बागवान, पाचू उघडे, गणेश चव्हाण, बापूसाहेब जाधव, दयानंद त्रिंबके, इब्राहिम मुल्ला, संजय शिंदे, सादिक तांबोळी, धनू मोरे, कुमार डमरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments