" स्पर्धा परीक्षेतील ध्येयपूर्तीसाठी योग्य ध्येयनिश्चिती,उत्तम नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, प्रचंड सहनशीलतेची गरज :प्रा.डॉ. खंडेराव खळदकर"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

जयसिंगपूर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने'स्पर्धा परीक्षेतील करीयरची संधी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.खंडेराव खळदकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
        
 अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात श्रेया कुराडे बी.ए. भाग- १ची विद्यार्थिनीने उपस्थित मान्यवरांचे प्रसन्न वातावरणात स्वागत करून प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, सद्यपरिस्थितीत प्रसन्न व आनंदायी जीवन जगणे खूप महत्वाचे असून यासाठी योग्य करिअर निवडणे गरजेचे असते यासाठी विद्यार्थ्यांना योग्य वेळी स्पर्धा परीक्षा करियरच्या अनुषंगाने उत्तम मार्गदर्शन व्हावे व ध्येयपूर्ती कशी करावी याबाबत करिअर फंडा लक्षात यावा हा एक उदात्त हेतू होता. श्रुती चव्हाण या विद्यार्थिनीने डॉ. खळदकर यांचा परिचय करून देताना एक सकारात्मक ऊर्जा त्यांच्या परिचयाच्या माध्यमातून निर्माण केली व विद्यार्थ्यांना व्याख्यान श्रवण करण्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.
          
यशाची गुरुकिल्लीची राज सांगतांना  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. खंडेराव खळदकर म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत  यश संपादन करण्यासाठी हे स्मार्ट वर्क व हार्डवर्क यांच्यात समन्वय साधावा लागतो यासाठी योग्य ध्येयनिश्चिती,उत्तम काटेकोर नियोजन, सातत्यपूर्ण प्रामाणिक अभ्यास, प्रचंड सहनशीलतेची गरज साधून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येते. या साठी  डॉ. खळदकर यांनी स्वतः  स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची व अनुभवांचे कथन केले.
      
 डॉ. खळदकर पुढे म्हणाले की, सातत्याने स्पर्धा परीक्षेचे वाचन वाढवणे यासाठी योग्य अभ्यासिकेचा व संदर्भ ग्रंथांचा वापर करावा. तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मित्रांशी सोबत करावी, स्पर्धा परीक्षेत यश व उच्च पदावर मजल मारणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भाषणे ऐकावीत, नोट्स काढाव्यात,विविध विषयाच्या अनुषंगाने सांगोपांग चर्चा करावी, नित्यनियमाने साप्ताहिक, पाक्षिक, मासिके व  वृत्तपत्रे यांचे वाचन करावे ज्यामुळे आपली अभ्यासाची पातळी व यशाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत याचं भान त्यामुळे लक्षात येते अशा प्रकारचे मौलिक मार्गदर्शन केले.
           
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ.पी.ए.पोवार म्हणाले की, यशाची गुरुकिल्ली नेहमीच विद्यार्थ्यांच्या हातात असते फक्त योग्य वेळ व प्रामाणिक प्रयत्न यामुळे यश शक्य होते. मात्र विद्यार्थ्यांनी स्पर्धा तयारीला वयाची अट घालून वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत याचा आत्मपरीक्षण करून वास्तविकतिचे भान ठेवावे. मात्र वयाच्या कमाल मर्यादे नंतर  थांबणे गरजेचे आहे. अशा प्रकारचं वास्तव विवेचन करून त्यांनी विद्यार्थ्याच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले.
       या कार्यक्रमात अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर माने,प्रा.सौ. स्वाती माळकर ,प्रा.मेहबूब मुजावर हे उपस्थित होते.सरतेशेवटी बी.ए.भाग १ ची  विद्यार्थिनी कु.तेजल भोसले हिने सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करून कार्यक्रमाला पूर्णविराम दिला. या सुंदर कार्यक्रमाचं उत्तम आभार प्रदर्शन बी.ए.भाग १ ची विद्यार्थिनी कु.श्रुती चव्हाण हिने मानले. या कार्यक्रमास बी.ए. अर्थशास्त्र विषयाचे असंख्य विद्यार्थी कोरोना नियमांना अधीन राहून सामाजिक अंतराचे पालन करून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे फीडबॅक म्हणून विद्यार्थ्यांनी खूप समाधान व आनंद व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments