बार्शी जवळील घटना! चालत्या एसटी बसला आग


बार्शी/प्रतिनिधी:

उन्हाची तीव्रता हळूहळू वाढू लागल्यामुळे, अंगाची लाही लाही होत आहे. अचानक चालत्या एसटी बसला आग लागण्याचे लक्षात येताच चालकाने मोठ्या शिताफीने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मोठी दुर्घटना टळली.

ही घटना बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथे सोमवारी आठ च्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी एम एच ०६  एस ८३२७ या क्रमांकाची बार्शी सोलापूर सर्व थांबा विठाई बस सोलापूर कडून बार्शी गाडी निघाली होती. रात्री आठच्या सुमारास शेळगाव आर येथे बस पोचली चालक अरुण गुळवे याला केबिन मधून धूर येत असल्याचे लक्षात आले काही वेळातच धुराची जागा आगीने धारण केली.

ही परिस्थिती चालकाच्या लक्षात येताच मोठ्या हुशारीने बस बाजुला घेउन ग्रामस्थांच्या मदतीने बस मधील सर्व प्रथम प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले, पेट घेतलेल्या बसला ग्रामस्थांच्या वतीने भिजवले या बसमधून 23 प्रवासी प्रवास करत होते.

Post a Comment

0 Comments