धक्कादायक! आजोबाने नातीसोबतच केलं हे संतापजनक कृत्य


 घाटंजी येथील बेलोरा या गावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. बालवयातच आई-वडीलांचं छत्र हरवलेल्या आपल्या ११ वर्षीय नातीवर आजोबानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दोष सिध्द झाल्यानंतर आरोपी आजोबाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोईद्दुीन एम.ए. यांनी बुधवारी या प्रकरणाचा निकाल दिला आहे.

आरोपी आजोबा हे पीडित मुलीच्या वडीलांचे वडील आहेत. घटनेच्यावेळी पीडित बालिका ही ११ वर्षाची होती.  २२ ऑक्टोबर २०१९ रोजी पीडितेची आजी यांनी पोलीस स्टेशन घाटंजी येथे पीडित नातीसोबत येऊन तक्रार दिली होती. मुलीचे वडील हयात असतांना शाळेच्या उन्हाळी सुट्टीत मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे अल्पवयीन मुलगी आणि तिची लहान बहिण आजोळी एका महिन्याच्या सुट्टयांसाठी राहायला गेली होती. त्यावेळी आजोबांनी नातीवर वारंवार अत्याचार केले. दरम्यान पीडित बालिकेच्या वडिलांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी आजोबा हे नातीसोबत बेलोरा येथे राहायला आले. त्याठिकाणी देखील आरोपीने नातीसोबत हा घाणेरडा प्रकार चालूच ठेवला.

आजोबांकडून सतत अत्याचार होत असताना पीडिता गर्भवती राहिली. मुलीने ही गोष्ट आजोबांच्या भीतीने कोणालाही सांगितली नव्हती. १५ ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदनासाठी संबंधित मुलगी शाळेत गेली आणि चक्कर येऊन खाली पडली होती. त्यानंतर सरपंच आणि पीडितेच्या आजीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू झाली .

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी प्रकरण चालविले. तर घाटंजी पोलिस ठाण्याचे पी.एस.आय आर. के. पुरी आणि किशोर भुजाडे यांनी तपास अधिकारी म्हणून  काम पाहिले आहे.

Post a Comment

0 Comments