कोल्हापूरमध्ये नवग्रह रत्न केंद्र सुरु....

( फोटो -  नवग्रह रत्न केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रांजली धामणे,अन्नू मोतीलाल,विजय भोसले,सत्यजित भोसले, यशोधरा भोसले आदी )

कोल्हापूर / प्रतिनिधी  : अंकशास्त्र, जोतिषशास्त्र, कुंडली, हस्तरेखा आणि फेसरिडींग असा अभ्यास करुन रत्न सुचविणे नवग्रह केंद्राद्वारे अन्नू.एच. मोतीलाल कोल्हापुरात करणार आहेत. आयुष्यात खऱ्या रत्नांचे किती महत्त्व आहे. याची माहिती व नवरत्न याची उपलब्धता केंद्राच्या माध्यमातून करुन देणार असल्याची माहिती अन्नू एच. मोतीवाला यांनी दिली.
नवग्रह रत्न केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

वडिलोपार्जित असणारी रत्नपारखी विद्या त्यांनी जोपासली असून कोल्हापूरमध्ये असेंब्ली रोड, शाहूपुरी येथे अन्नू यांनी 'नवग्रह रत्न केंद्र' सुरु केले आहे.गुजरात येथील कै. एच.के. मोतीवाला यांनी 1995 मध्ये शुभरत्न केंद्र सुरु केले.त्यांनी वडील,आजोबांकडून अवगत केली होती.

दुबई, अमेरिका, श्रीलंका, इंग्लंड यासारख्या विविध देशांमध्ये त्यांना डायमंड शोधण्यासाठी बोलवले जात होते. डायमंडची त्यांना चांगली पारख होती.  रत्नपारखी ही पारंपरिक व मौल्यवान विद्या आहे. पाच पिठ्यांपासून मोतीवाला रत्न शास्त्री यांनी रत्नपारखीची विद्या जोपासली आहे. या नवरत्नामध्ये माणिक, मोती, प्रवाळ,पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद आणि लसण्या असे रत्न आहेत. त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. रत्नपारखीची पदवी गुजरातमध्ये घेतली असून वयाच्या तेराव्या वर्षापासून 
याचे ज्ञान ग्रहण केले असल्याचे अन्नू.एच मोतीवाला यांनी यावेळी सांगितले. 

या केंद्राचे उदघाटन डॉ. प्रांजली धामणे (फिजिओथेरपीस्ट) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.विजय भोसले, श्री.सत्यजित भोसले,डॉ. यशोधरा भोसले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments