दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना देखील लोकांच्यात मात्र या गोष्टींचे गांभीर्य दिसत नाही. कारण बुलढण्यात कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमधून पळून जाऊन जवळच्या हॉटेलात किंवा ढाब्यावर जेवण व मद्यप्राशन करून परत रात्री कोविड सेंटरमध्ये दाखल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील एका धाब्यावर मनसोक्त मद्यप्राशन करून परत कोविड सेंटरच्या दिशेने जात असताना नांदुरा येथील एक ५५ वर्षीय रुग्ण अति मद्यप्राशन केल्याने महामार्गावर मध्यभागी पडलेला दिसला.
काही समाजसेवकांनी त्याला उचलून सामान्य रुग्णालयात भर्ती केले. भर्ती केल्यानंतर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिल्यावर कळले की हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून गेल्या तीन दिवसांपासून घाटपुरी कोविड सेंटर येथे भरती करण्यात आलेला आहे. खामगाव येथील घाटपुरी कोविड सेंटर मधून असेच काही कोरोना रुग्ण दाखल असताना रात्री पळून गेले आहेत.
0 Comments