सोलापूर शहराच्या झोपडपट्टीभागात चालत होता कुंटणखाना; दोघा महिलांना अटक


सोलापूर/प्रतिनिधी:

 शहरातील मदर इंडिया झोपडपट्टी भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात कुंटणखाना चालवणाऱ्या दोघा महिलेसह चार पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

उषा मुकेश चोपडे (वय-६०,रा.मदर इंडिया झोपडपट्टी हुडको कॉलनी नंबर ३,सोलापूर) अनिता सुधीर गवळी (वय-५६,रा.मदर इंडिया झोपडपट्टी,कॉलनी नंबर ३,सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील मदर इंडिया झोपडपट्टी घर नं ७, हुडको कॉलनी नं. ३ सोलापूर या ठिकाणी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याचे खात्रीशीर बातमी पोलिसांना सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मिळाली.


लगेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकण्याकरिता सापळा लावून बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री करून छापा टाकला. या छाप्यात उषा चोपडे व अनिता गवळी हे चार पीडित महिलांना स्वतःच्या घरात बोलावून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाढत होत्या. त्यांची शारीरिक पिळवणूक करून त्यांना पैशाचे आमिष दाखवून हा व्यवसाय करवून घेत होत्या. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे हे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,पोलीस उपायुक्त बापू बांगर,साहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कडील पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षिरसागर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बंडगर,सुवर्णा काळे,पोलीस नाईक इनामदार,महादेव बंडगर,मंडलिक, भुजबळ व गोरे आदींनी पार पाडली.



 

Post a Comment

0 Comments