गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे विरोधकांकडून सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. यावर राष्ट्रवादि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात काही झालं तरी विरोधक राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात, आतापर्यंत आठ ते नऊ वेळा मागणी करण्यात आली असून दर महिन्याला ही मागणी होत असते आणि त्यात नवीन काय आहे' असा सवाल करीत, जयंत पाटलांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.
तसंच, सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर गृहमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकारच्या बदलाची आवश्यकता नाही आणि आमच्या मनात असा विचारही नाही' असं सांगत गृहमंत्री बदलला जाणार नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
0 Comments