उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील दनकौर पोलिस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. शनिवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ महिलांसह २३ जणांना अटक केली. या प्रकरणात सहा पोलिसांना निलंबित करण्
यात आल्याची माहिती छापा टाकणाऱ्या पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शक्तिवर्धक औषधे, आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हॉटेलमध्ये पोलिसांच्या संगनमताने सुरू होते सेक्स रॅकेट
पोलिस उपायुक्त राजेश कुमार सिंह म्हणाले की, दनकौर परिसरातील चींती गावाजवळील ‘न्यू क्राउन प्लाझा’ हॉटेलमध्ये अनैतिक लैंगिक व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ‘माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस आयुक्त ब्रिजानंदन राय यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम तयार करण्यात आली. शनिवारी दुपारी पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकल्याचेही सिंह यांनी सांगितले.
त्यात पोलिस कर्मचारीही सहभागी होते
ते म्हणाले की, वेळी पोलिसांनी देह व्यापारात गुंतलेल्या महिलांना आणि हॉटेलचे व्यवस्थापक ज्ञानेंद्र यांच्यासह ११ पुरुषांना अटक केली. पोलिसांना घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य, शक्तिवर्धक औषधे जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. या देह व्यापाऱ्याचा रॅकेटमध्ये दनकौर येथील पोलीसही सामील आहेत. चौकशीनंतर चार पोलिस हवालदार, एक हेड कॉन्स्टेबल आणि पोलिस जीपच्या चालकाला निलंबित करण्यात आले आहे, असे डीसीपीने सांगितले.
दोन दिवसांपूर्वी येथून बदली करण्यात आलेल्या चौकी प्रभारीविरूद्ध निलंबन अहवाल देण्यात येत असल्याचे अधिका ऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, पोलीस ठाणे प्रभारी निरीक्षक दनकोर यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
0 Comments