जसपित जसप्रीत बुमराह अखेर विवाहबंधनात


भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज (१५ मार्च) स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटद्वारे त्याने लग्नाची माहिती दिली आहे. त्याच्या लग्नातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

जसप्रीतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने, आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

बुमराहला नविन इनिंगसाठी आयपीएलमधील संघ, मुंबई इंडियन्सने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बीसीसीआयनं बुमराहने केलेल्या ट्विटला रिट्विट करत, या सुंदर प्रवासासाठी खूप सारं अभिनंदन. तुम्हा दोघांना आयुष्यभर आनंद मिळो, या शुभेच्छा, असे म्हटलं आहे. याशिवाय बुमराहला टीम इंडियातील सहकाऱ्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments