रश्मी शुक्लांवर पुण्याच्या आयुक्त असताना खंडणी गोळा करायच्या ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप


बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना त्या खंडणी गोळा करत असायच्या आणि हा सर्व प्रकार धुमाळ या पोलीस निरीक्षकाच्या मार्फत व्हायचा असा खुलासाही राठोड यांनी केला आहे.

पुण्याच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला या कार्यरत असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, तसेच हा सर्व प्रकार माहीत असूनही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यावर पडदा टाकला असल्याचंही हरिभाऊ राठोड यांनी बोलून दाखवलं.
हरिभाऊ राठोड हे बंजारा समाजाचं नेतृत्व करतात. त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आणि देवेंद्र फडणवीसांवर असे गंभीर आरोप केल्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच या सर्व गोष्टींमुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. हरिभाऊ राठोड यांनी मुंबई येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हा गंभीर आरोप केला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल ट्विट करून रश्मी शुक्ला यांनी शिरोळ मतदारसंघाचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्यावर भाजपमध्ये राहण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता. त्यावर यड्रावकर यांनीही समोर येऊन प्रतिक्रिया देत या वृत्ताला दुजोरा दिला.

Post a Comment

0 Comments