औंरगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या उप तालुका प्रमुख असणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर तरुण दौलताबादमधील ग्रामपंचायत सदस्य देखील आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीच्या घरामध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला. सुनिल खजिनदार असे या तरुणाचे नाव आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह त्याठिकाणी सापडला होता.
मृत्यूचे प्राथमिक कारण आत्महत्या जरी सांगण्यात आले असले, तरी नातेवाईकांना वेगळाच संशय आहे. नातेवाईकांनी दौलताबाद पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे याठिकाणी शेकडोंचा जमाव गोळा झाला आहे. नातेवाईकांनी सुनिलची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल करण्याची मागणी सुनिलच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
या तणावाच्या परिस्थितीमध्ये दौलताबादमधील दुकाने, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी परिसरात तणावपूर्ण शांततेचं वातावरण पाहायला मिळते आहे.शवविच्छेदन झाल्यानंतर रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलीस ठण्यासमोर आणला आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहेत. घातपाताचा संशय व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी आहे.
0 Comments