४० वर्षे भाजपची सेवा केली हे चुकलं का? भाजप नगरसेवकाने लावले नाराजीचे होर्डिंग्ज!


पुण्यातील एक होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या होर्डिंगमध्ये भाजप नगरसेवकाने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. ४० वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपाची सेवा करतंय…हे आमचं चुकलं का? सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे आमचं चुकलं का? अशी विचारणा नगरसेवकाच्या वतीने करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या वतीने हा होर्डिंग लावला असून तीव्र व्यक्त करण्यात आली आहे.

नुकतीच महानगरपालिकेची स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात त्यांचं नाव अग्रेसर होतं, मात्र त्यांच नाव डावलून इतरांना अध्यक्षपद देण्यात आल्याने ते दुखावले गेले होते. यामुळेच त्यांच्या समर्थकांनी शहरभर अशा आशयाचे फलक लावून भाजपशी निष्ठावान राहूनदेखील डावलल जात असल्याने उघड नाराजी व्यक्त केल्याचं चित्र आहे. याचे पडसाद येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नसून फलकाची स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

या होर्डींगवर लोकनेते भाजपचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्व. अंकुशराव लांडगे आणि वडिलांचे फोटो आहेत. वुई सपोर्ट रवी लांडगे असा मजकूर या फ्लेक्सवर आहे. याद्वारे त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दादच पक्षाच्या वरिष्ठांकडे मागितल्याची चर्चा भोसरीतच नाही, तर संपूर्ण शहरात रंगली आहे. दरम्यान, त्यांचा राजीनामा महापौरांनी स्वीकारलेला नाही. तसेच ते आतापर्यंतच्या दोन्ही स्थायीच्या समितीला गैरहजर राहिलेले आहेत.

Post a Comment

0 Comments