करमाळ्यात बेकायदेशीर दारू विक्रेत्यावर कारवाई



बेकायदेशीर दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ मार्च ला सकाळी अकरा वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौफिक रज्जाक काझी यांनी फिर्याद दिली आहे.

बेकायदेशीर दारू विक्रेत्यावर कारवाई…

देवळाली ता.करमाळा येथे निसर्ग हॉटेलच्या बाजुला बेकायदेशीर दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ मार्च ला सकाळी अकरा वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौफिक रज्जाक काझी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की देवळाली येथे टेंभूर्णी हायवे जवळ बेकायदेशीर दारू विक्री केली जाते याची माहिती मिळाल्यावर आम्ही छापा टाकला असता निसर्ग हॉटेलच्या  पाठीमागे हनुमंत शिवाजी जाधव (रा.झरे) हा संत्रा देशी दारूच्या बाटल्या बेकायदेशीर विकत असल्याचे आढळले. त्याच्याकडे नऊ सिलबंद बाटल्या आढळल्या आहेत.

या प्रकरणी पोलीसांनी त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच शिवनेरी हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला योगेश दिलीप कसाब (रा.सावंत गल्ली, करमाळा) हा बेकायदेशीर दारू विक्री करताना असताना आढळून आला असून त्याच्याकडे ६७६ रूपये किंमतीच्या १३ सीलबंद बाटल्या आढळल्या असून सकाळी सव्वादहा वाजता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments