पुणेकरांना उपमुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊन बाबत आठ दिवसाचा अल्टीमेटम; रुग्ण संख्या कमी नाही झाली तर लॉकडाऊन


पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात सगळ्यात जास्त रुग्णांची संख्या पुण्यात आहे. दरम्यान, पुढील आठ दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव पुढच्या शुक्रवारी ( २ एप्रिल)  लॉकडाऊनसंदर्भात  निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे. 

अजित पवार म्हणाले,  पुढच्या शुक्रवारी लॉकडाऊनच्या बद्दल निर्णय घेण्यात येईल. कितीही इच्छा नसली तरी येत्या पाच सहा दिवसात अशीच रुग्णवाढ होत राहिली तर लॉकडाऊनशिवाय  पर्याय राहणार नाही .आज झालेल्या बैठकीत अनेकांचे खासकरून वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे असे मत होते की कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन करावा लागेल.  येत्या पाच सहा दिवसात काय होतं त्यावर ठरेल. 

Post a Comment

0 Comments