मंगळवेढा/प्रतिनिधी:
राहत्या घरात जबरदस्तीने घुसून एका १८ वर्षीय मुलीस मोटर सायकलवरून बालाजीनगर परिसरात नेवून अत्याचार केल्याप्रकरणी राहुल रमेश काळे (रा.नंदूर), कासू लक्ष्मण काळे (रा.डोणज) या दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल काळे यास अटक करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.२१ रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान वरील आरोपीने पिडीतीचे वडील नंदूर गावच्या शिवारात भिक्षा मागत असल्याचा व शेतकऱ्यांच्या खळयावर जात असल्याचा राग मनात धरून, पिडीतेच्या घरात प्रवेश करून तोंड दाबून राहुल काळे पिडीतेस मोटर सायकलवर घेवून जावून बालाजीनगर परिसरातील कॅनॉल पट्टीलगत असलेल्या एका नांगरलेल्या शेतात नेवून तीला विवस्त्र करून आरोपी याने जबरदस्तीने शरीर संबंध केले.
तर कासू काळे याने या घटनेस मदत करून धक्काबुक्की करीत शिवीगाळी दमदाटी केली तसेच चिलारीच्या काठीने मारहाण करून जखमी केले. पिडीतेस पुन्हा तीच्या घराजवळील मराठी शाळेजवळ आणून सोडून निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे करीत आहेत. यातील आरोपी राहुल काळे यास तात्काळ अटक करण्यात आली आहे.।
0 Comments