Coming soon म्हणत अमृता फडणवीसांनी फोटो केले शेअर


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर नुकतेच त्यांचे फोटो शेअर केले आहेत. अमृता फडणवीस या गायिका म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेतच, त्यांनी अनेक गाण्यात आवाज दिलाय तर खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांचा अल्बम आहे.

 मागे त्यांच्या गाण्यावर काहींनी टीका केली होती. त्यांना उत्तर देताना त्यांनी सांगितलं होत कि, काहीही झाले तर मी गाणे गाणारच, त्यांनी असे सांगून गुरुवारी गाणे रिलीज केले होते. तसेच त्यांनी नदी प्रदूषणाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून रिव्हर अँथेम हे गाणं गायलं आहे. 

आज त्यांनी फोटो शेअर करून त्यामध्ये coming soon....अशी घोषणा केली आहे. अमृता फडणवीसांचं नवीन गाणं येत असावं अशीच शक्यता अनेकजण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments