माढ्यातून पळ काढणाऱ्यांनी मला शिकवू नये; चंद्रकांत पाटलांचा पलटवार


शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू? म्हणत जोरदार टोला लगावला होता. आता चंद्रकांत पाटलांनी देखील पवारांवर पलटवार केला आहे. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये, अस चंद्रकांत पाटील म्हणाले.

(Advertise)

चंद्रकांत पाटील सांगली येथे बोलत होते. मला गाव सोडून जावं लागतं असं शरद पवार बोलले. पवारांना माढा मधून लढावं लागलं. मात्र पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडाव लागलं. पक्षा पेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments