करमाळा/प्रतिनिधी:
सोलापूर-पुणे -सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वे गाडीे ना जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा अशी मागणी करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार यांनी वरिष्ठ वाणीज्य मंडळ प्रबंधक सोलापूर यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मध्य रेल्वे ने सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागणी नुसार रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असुन सदरची रेल्वे एक मार्च पासून आठवड्यातून पाच दिवस पुढील आदेश येई पर्यंत सोलापूर पुणे सोलापूर धावणार असुन यामध्ये गाडीचे सर्व कोच आरक्षित असुन ही गाडी कुर्डुवाडी. दौंड असे दोनच ठिकाणी थांबणार आहे
जेऊर रेल्वे स्टेशनवर करमाळा तालुक्यासह परांडा. जामखेड कर्जत राशीन आदी भागातून प्रवाशी दवाखाना. खरेदी.ऑफिस कामासाठी तसेच दररोज कामासाठी जाणारे कर्मचारी पुणे येथे प्रवास करतात त्यातच कोरोना महामारी चे संकट अद्याप पर्यंत कमी झालेले नाही त्या मुळे रेल्वे प्रशासनाने अद्याप अनेक गाड्या बंद केल्या आहेत त्या मुळे सोलापूर पुणे सोलापूर एक्सप्रेस ला जेऊर थांबा दिल्यास सर्व सामान्य प्रवाशांची सोय होईल सध्या सोलापूर पुणे हा रेल्वे मार्ग दुहेरीकरण विद्युतीकरण झालेला असुन सदर गाडीला कुर्डुवाडी व दौंड असे दोनच ठिकाणी थांबा आहे त्या मुळे जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ वाणीज्य मंडळ प्रबंधक सोलापूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments