माघी एकादशी निमित्ताने रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आकर्षक फुलांची आरास


पंढरपूर/प्रतिनिधी:

माघी यात्रा, जया एकादशी सोहळ्या निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास आकर्षक व सुंदर अशी झेंडू च्या फुलाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यंदाच्या माघी यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या सजावटीसाठी झेंडू या प्रकारच्या सुमारे एक टन फुलाचा वापर करण्यात आला आहे. मंदिर गाभाऱ्याशिवाय नामदेव पायरी, सभामंडप याठिकाणीही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
(Advertise)

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सण उत्सव काळात दानशूर व्यक्तीकडून फुलांची आरास करण्यात येते. यामध्ये केसरी, पिवळा झेंडू, शेवंती, ग्लँडीओ, आँरकेड, ब्लू डी जे, सँगोप अशा रंगीत संगीत  या फुलांची आरस करण्यासाठी वापर करण्यात आला आहे.यासाठी लागणारी फुले ही पुणे येथील सचिन चव्हाण, संदीप पाटोळे पाटील, युवराज सोनार यांच्यावतीने देण्यात आलेली आहेत. या फुलांची आकर्षक आरास विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात येणाऱ्या भाविकांना अधिक प्रसन्न करीत आहे.

(Advertise)

विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वेगळ्या रंगाच्या फुलांची सजावट आकर्षित करत आहे. माघी वारी व जया एकादशीच्या निमित्ताने भाविक देखील विविध अलंकारांनी सजवलेल्या आपल्या लाडक्या विठू रुक्माईचे रूप पाहण्यासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी असतात. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद आहे तर पंढरपुरात एकादशी दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments