बार्शी/प्रतिनिधी:
दिवसाढवळ्या बंद घर फोडून त्यातील रोख रक्षम व दागिन्यांसह पावणे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दार्शी शहरातील उपळाई रस्त्यावरील चव्हाण प्लॉट मध्ये पडली आहे. याबाबत घरमालक श्रीकांत पंडित कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीकांत कुलकर्णी आपल्या पत्नीसमवेत दुपारी तीनच्या सुमारास पराला कुलूप लावून सोमाणी हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. ते ५ वा. घरी परत आले तेव्हा घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडलेला होता व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातील लोखंडी कपाट तोडून त्यात ठेवलेली रोख रक्कम दहा हजार रु व सोन्याचे व चांदीचे दागिने गायब झाले.असा एकूण पावणे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.
0 Comments