पंढरपूर तालुक्यातील चळे गाव महावितरणकडून दीडशेहून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित, शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरू


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील चळे गावामध्ये १५० अधिक शेतकऱ्यांचे शेतीपंपाची वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी कंपनी विरोधात आंदोलन सुरू केली. शेतकऱ्यांना वाढीव वीज बिलाबाबत आक्रमक झाले आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती लावली व सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंप सव्वाशे रुपये विर आकारण्यात येत होती. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना ते बिल अडीशे रुपये करण्यात आले. त्यावेळीही शेतकरी विज बिल पूर्ण भरत होते. मात्र सध्याच्या काळात शेतकऱ्यांना लाखोची बिले जातात. शेतकरी अडचणीत असताना, एवढे बिल कसे भरणार, असा सवाल पांडुरंग सहकारी कारखाना माजी चेअरमन दिनकर मोरे यांनी उपस्थित केला.


 वाढदिवस बिलासंदर्भात गावांनी एकत्र येण्याची गरज...
दिनकर मोरे पुढे बोलताना म्हणाले.. चळे गावाला सात किलोमीटरचा भीमा नदी लाभले आहे. या किलोमीटरच्या पट्ट्या मध्ये एक हजारहून अधिक शेतकरी आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून आसामी संकटामुळे ऊस वाहून गेला आहे. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र अजून 70 टक्के शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित आहे. मात्र वीज कंपनीकडे सहा तास वीज वापर शेतकऱ्यांना 24 तासाच बिल देण्यात येतात. वीज बिलाची चौकशी करून योग्य ते बिल द्यावे,  तसेच दिवंगत मुख्यमंत्री पाटील यांच्या काळातील वीज बिलासंदर्भातील पद्धत वापरावी, अशा पद्धतीने बिल दिल्यानंतर संपूर्ण शेतकरी वीजबिल भरले. मात्र या जुलमी सरकार तसेच वाढीव विजबिल विरोधात सर्व गावांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

वीज पुरवठा खंडित केल्यास पिकाचे अतोनात नुकसान...

स्थानिक शेतकरी बोलताना म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार वीज महामंडळ वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. चळे गावांमध्ये शेतकऱ्यांच्या दीडशे ते दोनशे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचे पाणी नसल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. विज बिल वसूल करताना कर्मचारी धमकावत आहेत.

हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता...
चळे येथील एका शेतकऱ्याची पाच एकर बागायत क्षेत्र आहे. त्यामध्ये तीन एकर फळबाग क्षेत्र असून. हे पीक काढणीसाठी आले आहे. मात्र वीज मंडळाकडून शेतामध्ये वीजपुरवठा खंडित केला तर हाता तोंडाला आलेले पीक वाया जाण्याची दाट शक्यता आहे. वीज मंडळाकडून सुमारे तीन लाख रुपये बिल देण्यात आले आहे. मात्र पिकांसाठी वीज नसल्यामुळे पर्यायी व्यवस्थेचा प्रश्न उद्भवत नसल्याचे खंत यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवतो.

Post a Comment

0 Comments