सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!




सोन्याच्या भावात वारंवार चढ-उतार पहायला मिळत असतात. अशातच आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली सराफ बाजारात एमसीएक्सवर सोन्याचा भाव ०.२ टक्क्यांनी घसरुन प्रति १० ग्रॅम ४६१४५ रुपयांवर गेला आहे.

जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस ०.४ टक्यांनी घसरुन १,७६९.०३ डॉलर झाली.  या घसरणाऱ्या किंमतीमुळे सोनं आणखी स्वस्त झालं आहे. भविष्यातही सोन्याच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा आजचा भाव हा १ टक्क्याने घसरला असून ६८ हजार ४७९ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तसंच जागतिक बाजारात चांदी १.१ टक्क्यांनी घसरुन २६.७१ डॉलर प्रति औंस झाली आहे.

दरम्यान, बुधवार १७ फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव १५७ रुपयांनी घसरला होता. यामुळे सोन्याचा भाव दर दहा ग्रॅम ४६ हजार ७२० रुपये झाला होता. त्याच दिवशी चांदीच्या भाव १०९ रुपयांनी घसरण पहायला मिळाली होती. त्यामुळे चांदीचा भाव ६९ हजार ४६५ रुपयांवर पोहोचला होता.

Post a Comment

1 Comments