मंत्रिपदे हे मिरवण्याची गोष्ट नाही. त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांना तसेच सर्वसामान्य माणसांना किती होतो? हा खरा महत्त्वाचा विषय असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्यावरून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भरणेंवर निशाणा साधला. इंदापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
त्यासोबतच आम्ही पाहतोय किती कामं होत आहेत. १४ कोटी जनतेपैकी ४० ते ४२ लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्याचा उपयोग लोकांच्या हितासाठी करायचा असतो. दुर्दैवाने सध्याच्या सरकारमध्ये तशी लोकं दिसत नाही, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला.
याआधी दत्तात्रय भरणेंनी, मंत्रिपदे हे मिरवण्याची गोष्ट नाही मी खोटं-नाट वैगरे अजिबात करणार नाही. जे काही करेल ते प्रामाणिकपणे तुम्हा सर्वसामान्यांसाठी करेल, असं म्हटलं होतं. याच वक्तव्याचा पाटलांनी समाचार घेतला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटलांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारवर टीका केली.
दरम्यान, सरकार चालवताना नैतिकता लागते. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील तथ्य ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून बाहेर आलं आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. जीवनाता काम करतानाा नैतिक मूल्य सांभाळून काम कराव लागतं. ते सध्या होताना दिसत नाही. अशी किती प्रकरणे झाल्यावर सरकारला जाग येणार आहे, असा सवाल पाटलांनी केला.
0 Comments