"कुठलंही पवित्र काम करताना आपल्याला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. ज्या मातीत छ. शिवराय होऊन गेले, त्याच मातीची आपण लेकरं आहोत. महाराष्ट्रापासून शिवरायांना वेगळं करता येत नाही. स्वराज्यावर चालून आलेल्यांची शिवरायांनी कशी वाट लावली आपल्याला माहीत आहे. त्यावेळा शस्त्रांनी युद्ध केली जात, पण आता जरी शस्त्रं वापरली जात नसली तरी आपलं युद्ध सुरू आहे. त्याचं नाव कोरोना युद्ध आहे. त्यात मास्क आपल्याकडे ढाल आहे. त्याचा वापर आपण करायला हवा आणि हे युद्ध जिंकायला हवं", असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवनेरी किल्ल्यावर शिवजंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, "कोरोनासंदर्भात रविवारी बैठक घेतली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोनावर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत", असे मत अजित पवार यांनी सांगितले.
0 Comments