गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रातील अमरावती, यवतमाळ, नागपुरात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. मात्र, येथील लोकप्रतिनिधींना मात्र याच गांभीर्या नसल्याचे दिसत आहे.
रवी राणा आणि नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात राणा दाम्पत्य कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे. दुचाकीवरून फिरणाऱ्या राणा दाम्पत्याच्या तोंडावर मास्क नाही. इतकंच काय त्यांनी हेल्मेटदेखील घातलेलं नाही. अमरावतीच्या रस्त्यांवर विनामास्क, विनाहेल्मेट रपेट मारणाऱ्या राणा दाम्पत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे सर्व नियम, कायदे फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत का? असा प्रश्न आता नागरिकांच्या माध्यमातून विचारला जात आहे. विशेष म्हणजे राणा दांपत्यावर अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
0 Comments