प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:
युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी प्रवीण पांडुरंग पाटील यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन शाहूवाडी पोलीस स्टेशन परिसर जि.कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आले होते. या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी मा.पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. ही लागवड प्रवीण पाटील यांच्या नियोजन,सहकार्य व प्रेरणेमुळे शक्य झाले.
शाहूवाडी पोलीस निरीक्षक विजय पाटील या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणाले की, पोलीस स्टेशन म्हटले की, त्या ठिकाणी नेहमी गुन्हेगार व आरोपी यांची वर्दळ व या लोकांशी सातत्याने संपर्क येत असतो. त्यामुळे मन व शरीर सातत्याने यांच्या भोवती फिरत असते त्यामुळे सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता जपण्याची किती ही इच्छा असली तरी या गोष्टीमुळे सहसा ते शक्य होत नाही. परंतु वृक्षमित्र प्रवीण पाटील यांच्यामुळे हे वृक्षारोपण करून सामाजिक कार्य शक्य झाले. खूप दिवसापासून प्रवीण यांचे सामाजिक कार्य पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. ते फक्त सामाजिक कार्य करीत नाहीत तर ती इतरांकडून सामाजिक कार्य घडवून आणतात हे त्यांचं एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आमच्याकडूनही अशा प्रकारचे कार्य त्यांनी घडवून आणले.त्यामुळे प्रवीण पाटील यांनी वृक्षारोपणाचा सपाटा लावला आहे तो कौतुकास्पद व अभिनंदनीय गोष्ट आहे हे मात्र सत्य आहे. त्यामुळे त्याच्या कार्याबद्दल आम्हा सर्वांस खूप आनंद व समाधान वाटते.
0 Comments