पंढरपूर तालुक्यात विजेचा धक्का बसून क्रीडा शिक्षकाचा मृत्यू



पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात विजेचा धक्का बसून तरुण क्रीडा शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय कुमार घाडगे असे मृत्यू झालेल्या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे. तालुका पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद देण्यात आली आहे.

सुस्ते गावात विजयकुमार घाडगे हे सकाळच्या सुमारास शेतामध्ये कामासाठी गेले होते. मात्र शेतात असणाऱ्या विजेच्या पोलाला त्यांचा हात लागल्यामुळे विजेचा धक्का बसल्यामुळे होरपळून मृत्यू झाला. 

(Advertise)

शेताच्या शेजारी असणाऱ्या त्यांचे चुलत बंधू उत्तम घाडगे यांनी याबाबत घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता. उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. विजयकुमार घाडगे यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद अमरजीत घाडगे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. अशाप्रकारे मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments