पांगरी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यात बहुचर्चित ठरलेल्या चिखर्डे गावात आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील येडेश्वरी ग्रामविकास पॅनल ने ११ पैकी ११ उमेदवार जिंकून विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.
आमदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चिखर्डे गावचे युवा नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांना धूळ चारली आहे. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये २१ वर्षाच्या युवतीचा हि समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणाऱ्या प्राजक्ता रामलिंग कोंढारे यांना संधी देऊन निवडून हि आणण्याची किमया प्रकाश पाटील केली आहे. तरुणांना राजकारणात संधी दिल्यामुळे तरुणांचे प्रश्न अधिक जोमाने मांडले जातील व त्याला न्याय मिळेल. येत्या काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडून आलेल्या अकरा उमेदवाराची यादी पुढीलप्रमाणे
🔸पाटील प्रकाश शिवाजी,
🔸चौधरी अरुण रामहरी,
🔸कोंढारे प्राजक्ता रामलिंग,
🔸कोंढारे संभाजी बापूराव,
🔸अपुणे फुलबाई विलास,
🔸शेख हिना समीर,
🔸देवकर सुभाष साहेबराव,
🔸पाचकवडे माधुरी सचिन,
🔸आडगळे जयराम नारायण,
🔸यादव जनाबाई वसंत,
🔸मसेकर शोभा मोहन.
चिकर्डे ग्रामपंचायत विजयासाठी प्रकाश पाटील, अमित कोंढारे, संजय कोंढारे, बाळासाहेब कोंढारे, आयुब शेख, प्रमोद सवणे, बाप्पा मोरे, नानासाहेब कोंढारे, विजय कोंढारे, विक्रम पाटील, ज्ञानदेव कोंढारे, अशोक कोंढारे, हमीद शेख, पांडुरंग मसेकर, नाना देवकर, पिंटू गायकवाड, प्रदीप पाचकवडे यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
0 Comments