माघी एकादशीला पंढरपुरात संचारबंदी, एसटी सेवा सुरळीत राहणार



पंढरपूर/प्रतिनिधी:

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून माघी एकादशी निमित्ताने २३ फेब्रुवारी रोजी पंढरपूर शहर आसपासच्या १० गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे माघी एकादशी दिवशी भाविकांना पंढरपूर मध्ये प्रवेश बंदी असणार आहे. मात्र यादरम्यान एसटी सेवा सुरळीत राहणार आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा माघी एकादशी सोहळा २२ ते २३ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे. या दिवशी पंढरपुरात गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून एक दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी पंढरपूर शहरासह शेगाव दुमाळे, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपूर, गादेगाव, कोर्टी, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे या गावांमध्ये संचारबंदी असणार आहे. या काळात पंढरपूर मध्ये कोणत्या भाविकाला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच धर्मशाळा, मठ, लॉज या ठिकाणी बाहेरगावी व्यक्तींना राहण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात आपत्कालीन व्यवस्था सुरू राहणार आहे.

एसटी सेवा सुरू राहणार

पंढरपूर शहरासह दहा गावात एकादशी दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पंढरपूर येथील एसटी सेवा सुरळीत राहणार आहे. मात्र बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांना विठ्ठल मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत एसटी प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या आदेशही देण्यात आले..

विठ्ठल मंदिर दोन दिवस दर्शनासाठी बंद..

विठ्ठल मंदिर समितीकडून माघी एकादशी ते द्वादशी या दिवशी विठ्ठल मंदिर मुखदर्शनासाठी बंद राहणार आहे. विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून निर्णय आधीच घेण्यात आला आहे. २२ ते २३ फेब्रुवारी रोजी विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन भाविकांसाठी बंद असणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून मुखदर्शन सुरळीत करण्यात येणार आहे. मात्र या काळात विठ्ठलाची नित्यपूजा सुरूच राहणार आहे.

Post a Comment

0 Comments