प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:
'जयसिंगपूर शहर व परिसर कार्बन कणांनी प्रदूषित; जनतेचे आरोग्य धोक्यात' या शीर्षकाखाली ३ जानेवारी २०२१ रोजी 'लोकवार्ता डिजिटल न्युज पोर्टलच्या' वतीने बातमी लावून आवाज उठविण्यात आला होता. त्याच वेळी निर्भीड सामाजिक कार्यकर्ते आदम भाई मुजावर व स्वराज्य क्रांती चे पदाधिकारी यांनी जयसिंगपूर शहरात प्रचंड प्रमाणात पडणारी राख व त्यामुळे निर्माण झालेला जनतेच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ८ जानेवारी २०२१ रोजी प्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण विभाग,कोल्हापूर यास व जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनास विनंती अर्जाद्वारे या प्रश्नाविषयी सूचित करण्यात आले होते.
त्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेने प्रदूषण मंडळास पत्र पाठवून लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी याविषयी कळविले होते.त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण विभाग, उपप्रादेशिक कार्यालय ,कोल्हापूर यांनी २५ जानेवारी २०२१ रोजी संबंधित कारखान्याची राख व जयसिंगपुरात पडणाऱ्या राखीचे नमुने तपासणीसाठी लॅबकडे पाठविण्यात असल्याचे पत्र आदम भाई मुजावर यांना या प्रदूषण मंडळाकडून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे .त्याच वेळी आदम भाई यांनी या कार्यालयास २ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या तपासणी नमुन्याचा अहवाल प्राप्त व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र या घटकाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे प्रशासन व प्रदूषण मंडळ याविषयी गंभीर नाही हे लक्षात येताच त्यांना आव्हान केल्या प्रमाणे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ४ फेब्रुवारी २०२१ पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात मा. जिल्हाधिकारी साहेब यांना पत्राद्वारे या आंदोलनाविषयी माहिती देऊन १० फेब्रुवारी २०२१ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. परंतु ९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही तपासणी नमुना अहवाल प्राप्त झाला नाही. तसेच प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे लोकांचा जीवन मारण्याचा हा प्रश्न सोडविण्यासाठीची मागणी १.राखेतून निर्माण होणारा प्रदूषण थांबवणे व २.सार्वजनिक आरोग्याबाबत सरकारला जागृत करून न्याय देणे या मागणीसाठी बुधवार दिनांक १० फेब्रुवारी २०२१ पासून आमरण उपोषणास सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती धरणे आंदोलनकर्ते आदम भाई यांनी दिली होती.
(Advertise)
मिळालेल्या माहितीच्या संदर्भावरून प्रशासनाला संबंधित शहरातील व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाचे गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत होता. या प्रश्नाविषयी जयसिंगपूरातील नागरिकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रतिसाद देऊन जयसिंगपुरातील लोकप्रतिनिधीनी यामध्ये जातीने लक्ष घालावे व यातून अंतिम मार्ग काढावा अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त केली होती.त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर कसा सोडवला जाईल याविषयी जयसिंगपूर शहर व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आज दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी आदम भाई मुजावर व स्वराज्य क्रांती जनआंदोलनाचे पदाधिकारी यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली होती.परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांनी तातडीने आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. उप प्रादेशिक अधिकारी कोल्हापूर मा. प्रशांत गायकवाड यांनी लेखी दिलेल्या नमुना अहवालानुसार घोडावत इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड रिफायनरी व दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड,शिरोळ हे दोषी आढळले आहेत.
त्यामुळे संबंधित प्रशासनाने दिलेल्या रिपोर्टनुसार वरील दोष सुधारणा करण्यास सात दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत सदर कारखान्याने दोष सुधारणा न केल्यास त्यांचेवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे.यासंदर्भात त्यांनी लेखी पत्र दिले असल्यामुळे स्वराज्य क्रांती जनांदोलनाचे आदमभाई मुजावर, अध्यक्ष जीवन पाटील व सर्व पदाधिकारी यांना सात दिवसाच्या आत मध्ये कारवाई करण्याचे लेखी आश्वासन व राखेचा नमुना अहवाल दिल्यामुळे सदरचे सुरू असलेले आमरण उपोषण संबंधित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. पुन्हा सदर काळात संबंधित कारखान्यावर उचित कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू केले जाईल अशा प्रकारचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
0 Comments