सोलापूर जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच पदाच्या २३ डिसेंबरला तर काही तालुक्यांच्या २६ डिसेंबरला निवडणुका लागणार



बार्शी/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यातील सरपंच पद व उपसरपंच पदाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाकडून सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र पंढरपूर, सांगोला तालुक्यातील गावांच्या सरपंचपदाचे आरक्षण नव्याने करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 

२३ फेब्रुवारी रोजी गावातील गाव कारभारी ठरणार

सोलापूर जिल्ह्यातील १५ जानेवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान झाले होते तर १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर २७ जानेवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र काही त्रुटींमुळे काही तालुक्यांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा घेण्यात येणार आहे. मात्र उर्वरित राहिलेल्या सरपंच पदाच्या निवडणुका २३ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बार्शी, माढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माळशिरस या तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदाची निवडीचा गुलाल उधळला जाणार आहे. याची खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून तालुका प्रशासनाला आदेश दिले आहेत.

पंढरपूर, सांगोला तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडणुका २६ फेब्रुवारी

पंढरपूर तालुक्‍यातील ७२ आणि सांगोला तालुक्‍यातील ६१ या ग्रामपंचायतीतील सरपंच पदाच्या पदाचे आरक्षण नव्याने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. सरपंच पदाच्या नव्या आरक्षणानंतर २६ फेब्रुवारी रोजी या गावांमध्ये सरपंच पदाची निवडणूक लढणार आहे. त्यामुळे गाव कारभाऱ्यांनी आता आपल्या ग्रामपंचायत सदस्यांवर लक्ष ठेवून आहेत व तालुका पातळीवर सरपंच पदाच्या निवडणुकीचा लगबग सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments