.....आणि ममता दिदीच्या खासदारानं संसदेत बोलता बोलता दिला राजीनामा


तृणमूल काँग्रसेच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज संसदेत बोलता बोलता आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

“माझ्या राज्यात हिंसा सुरु आहे. त्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. या विषयावर जर काही बोलू शकत नाही तर मग मी त्यापेक्षा माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देतोय”, अशी खदखद दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केली

भाजप बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधनीला लागली आहे. ममता सरकारला सुरुंग लावण्यासाठी मोदी सर्वेतोपरी प्रयत्न करत आहे. भाजपने याआधी ममता बॅनर्जी यांचे एकेकाळी निकटवर्तीय मानले जाणारे शुभेंदु अधिकारी, मुकूल रॉय सारख्या बड्या नेत्यांना भाजपात सामील करुन घेतलं आहे. भाजपने आता दिनेश त्रिवेदी यांच्याकडे आपला मोर्चा वळवलाय. त्रिवेदी देखील भाजप प्रवेशासाठी सकारात्मक असल्याची चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Post a Comment

0 Comments