पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर राज्याच आराध्य दैवत असलेली दक्षिण काशी परंतु हीच दक्षिण काशी मागील काही वर्षांपासुन गुन्हेगारी पार्श्वभूमीने दुमदूमताना दिसत आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी चंद्रभागा नदीपात्रातुन होत असलेली बेसुमार वाळु चोरी आणि त्यातुन एका राञीत अगदी सहज रित्या होत असलेली हजारो रूपयांची उलाढाल या वाळु चोरीमुळे आणि त्यातुन मिळालेल्या पैशामुळे दिवसा घडलेले लहान-लहान वादविवाद राञीत एकमेंकांना संपवण्यापर्यंत जातात आणि नंतर सुरू होतात टोळी युध्द मग त्यातुन दगडफेक – पंढरपूर बंद असे वारंवार घडत असलेले प्रकार राज्यभरातील विविध ठिकाणाहून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरिता आलेले भाविकांना व इतर स्थानिक नागरिक व्यापारी यांना याचा नाहक ञासास सामोरे जावे लागत आहे.
परंतु मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी पंढरपूर शहर व ग्रामीण भागामधिलही गुन्हेगारी क्षेञाचे मुळ असलेल्या वाळु चोरीवर स्वता अधिक लक्ष केंद्रित करून अवैद्य रित्या वाळु चोरी करनार्यांवर कठोर कारवाई करत असल्याचे सध्या तरी दिसत आहे तसेच इतर ही अवैध व्यवसाय किंवा वाढत्या गुन्हेगारीचा आलेख आटोक्यात ठेवण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी पाहून त्यास तडीपार करण्याच्या प्रस्ताव निर्णयामुळे गुन्हेगारी आटोक्यात येईल असे वाटत आहे.
याबाबत पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना अधिक विचारले असता ते म्हणाले की
सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक यांचे सुचनेनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नागरिकांना तसेच दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी क्षेञातील नागरिकाची सध्याच्या दैनंदिन नागनुकीतील पार्श्वभूमी पाहून योग्य निदर्शनार्थी संबधित व्यक्तीस एक वर्ष आणि त्यापेक्षा अधिक कालावधी करिता तालुक्यातुन किंवा जिल्ह्यातुन तडीपार करण्याचे प्रस्तावास अनुसरून पंढरपूर शहर व ग्रामीण भागामधिल काही प्रस्ताव पाठवले आहेत त्यावर त्या-त्या स्तरावर पुढील उच्चीत कारवाई होईल तसेच आनखी काही प्रस्ताव शहर, तालुका, करकंब, आणि ग्रामीण या चार पोलिस ठाण्याकडून मागवण्यात येत आहेत.
तरी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नागरिकांनी वेळीच आपल्या वर्तुनुकीत बदल करून आपल्या पासुन समाज्यातील इतर कोणत्याही नागरिकांना नाहक ञास झाला नाही पाहिजे हे लक्षात ठेवावे अन्यथा….असे बोलत त्यांनी गुन्हेगारांना एक प्रकारे इशारा कारवाईत्मक तंबी दिली आहे.
0 Comments