संजय राठोड राजीनामा देणार; पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराजांची माहिती


 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या भोवती संशयाची सुई फिरत आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधीपक्षाने रान उठवले असतानाच, राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे आज वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे येणार आहेत. ते आपल्या मंत्रिपदाचासोबतच आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे. यासंदर्भात पोहरादेवी येथे बैठक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच राठोड राजीनामा देण्याआधी बंजारा समाजाचे महंत तसेच बंजारा समाजाशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतील, असेही म्हटले जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. सरकारवरील वाढता दबाव लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे संजय राठोड हे स्वत:हून राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Post a Comment

0 Comments